Raj Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"अमरावती सारखा प्रयत्न राज्यात पुन्हा झाला तर..."; राज ठाकरे आक्रमक

जय श्री रामच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी केलं भूमिकेचं स्वागत.

सुधीर काकडे

गेल्या काही दिवसांपूर्वी आसामध्ये झालेल्या एका कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. धार्मिक स्थळ पाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती (Amravati), मालेगाव आणि नांदेड सारख्या काही भागांत मोठा हिंसाचार झाला होता. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे हे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी संघटना बांधणीच्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू केल्याचं दिसतंय. त्यातच त्यांनी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी साहेबांचा आदेश म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.अमरावतीमध्ये जो प्रकार झाला, तो प्रयत्न जर पुन्हा महाराष्ट्रात झाला तर सोडायचं नाही. प्रत्येकाला आपल्या घरावरती आणि घराजवळच्या चौकावरती आपल्या पक्षाचा झेंडा लावण्यास सांगा असं आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केला.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देत त्यांच्या या भूमिकेंचं स्वागत केल्याचं दिसलं. तसेच नवीन वर्षात धूम धडाका सुरू करू असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे आता आगामी काळात राज ठाकरे आपल्या हिंदुत्वादाच्या भूमिवरून आक्रमक होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT