Trimbakeshwar Controversy esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: "100 वर्षांची प्रथा" भोंग्यावर आक्रमक होणारे राज ठाकरे त्र्यंबकेश्वर प्रकरणात मात्र..

रुपेश नामदास

नाशिक येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर सध्या चर्चेत आहे. या मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असा नियम आहे. मात्र 13 मे रोजी रात्री काही तरुणांनी मंदिराचे उत्तर दरवाजातून जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला.

यानंतर तणाव पसरल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी ते म्हणाले, वर्षानुवर्षे जर तिथली प्रथा असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी मंदिरे आणि मशिदी आहेत, त्याठिकाणी हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात . Latest Marathi News

माहिम मधील उरूसाला माहिम पोलिस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो, जर इतर धर्माचा माणूस मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा कमकुवत धर्म आहे का? अशा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर पुढं बोलताना म्हणाले, मी देखील अनेक दर्ग्यात गेलो असल्याचे त्यांनी सांगितले तर त्र्यंबकेश्वर मंदिराचा निर्णय गावकऱ्यांनी घ्यायचा आहे. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. Marathi Tajya Batmya

दरम्यान त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला.

या १० ते १२ युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथे बंदोबस्तास असलेले एमएसएफ जवानांनी त्यांना रोखले. आपणास आत जाता येणार नाही असे सांगीतले. त्यानंतरही जवळपास १५ मिनेट त्यांची हुज्जत झाली. मात्र अखेर प्रवेश न घेता ते तेथून पुढे निघुन गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT