Raj Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

MNS : शर्मिला ठाकरेंच्या 'त्या' विधानानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर

दत्ता लवांडे

मुंबई : "शिवसेनेने साद घातली तर येऊदेत" असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्याचबरोबर उद्या राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिली. शर्मिला ठाकरेंच्या विधानानंतर उद्याच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

(Raj Thackeray Latest News)

दरम्यान, राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून राज्यातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ते उद्या पुन्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला असून या शिवसेनेने साद घातली तर ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज ठाकरे उद्या पुन्हा आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात काही बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्चे तेल 5% महाग! पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर

Dapoli Accident News: शेवटचा पेपर देऊन घरी परतताना अपघात, २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू; मैत्रिण गंभीर जखमी

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाआधीच सरकारचा मोठा धक्का! ‘या’ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ नाही

Live Marathi News Update : पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी सरसंघचालकांना अरविंद शिंदे यांचे पत्र

Farmer Loan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ

SCROLL FOR NEXT