raj Thackeray slam ashish shelar over his criticism of after bjp loss in karnatak again prais congress  
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray On BJP : "छोटी माणसं, यांचं अस्तित्व मोदींमुळे टिकून"; राज ठाकरेंचा भाजप नेत्यावर प्रहार

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे, यावरून राज ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावत काँग्रेसच्या विजयाचं कौतुक केलं. यावर भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा त्याबाबींचा पुनरुच्चार केला आहे.

भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, "ज्यांची पोहच नसते त्यांना या गोष्टी सुचू शकतात. ही कोण लोकं आहेत? निवडणूका असतात तेव्हा कुठंतरी नाक्यावर सभा घेणारी ही लोकं असतात. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी मान्य करायला पाहिजेत. तशा गोष्टी नरेंद्र मोदी करू शकतात. तर पक्षातल्या घालच्या कार्यकर्त्यांना कळायला पाहीजेत."

"भारत जोडो यात्रेचा कितीही जरी झाकाण्याचा प्रयत्न झाला तरी तो परिणाम कर्नाटकच्या निवडणूकीत दिसला. या गोष्टी मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजेत. आपण एखाद्याला पराभवातून बोध घ्यायचाच नसेल तर वागा तसेच", असे राज ठाकरे म्हणाले.

छोटी माणसं आहेत...

ते अस्तित्व टिकवण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत, या आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, "यांचं अस्तित्व मोदींमुळे टिकून आहे. त्याशिवाय यांना खाली कोण ओळखतं? मी यांच्या बोलण्याच्या फार काही वाटेला जात नाही. छोटी माणसं आहेत."

भारत जोडो यात्रेचा फायदा झाला असे सांगत हा भाजपचा पराभव असून आपले कुणीही वाकडे करू शकत नाही या भावनेचा, भाजपच्या या स्वभावाचा आणि वागणुकीचा हा पराभव असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. यावरून संतापलेले भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं. शेलारांनी घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो अशी बोचरी टीका राज ठाकरेंवर केली.

आशिष शेलारांनी काय टीका केली?

घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव पडला असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? तेथे राहुल गांधीच्या यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का? राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही

राज ठाकरे राहुल गांधींबद्दल काय म्हणाले होते?

कर्नाटक मधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिमाण आहे. तर कर्नाटकमधील भाजपचा पराभव हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकड करू शकतो असा जो विचार करतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला लोकांना कधी गृहीत धरू नये. याचा सर्वांनीच बोध घेण्याची गरज आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा. अशा शब्दात भाजपला राज ठाकरेंनी सल्ला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT