Raj Thackeray Social Media Maharashtra Politics On Backdrop Of Shinde Vs Thackeray Fight For Shivsena  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics...तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील; सोशल मीडियावर रंगली चर्चा

शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्या गदारोळात राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना वेगळ्याच सूचना दिलेल्या आहेत. मात्र, त्यांच्या सूचनेवरुन राजकीय वर्तुळाच चर्चेला उत आला आहे. राज ठाकरेंना अनेक युजर्सनी सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. (Raj Thackeray Social Media Maharashtra Politics On Backdrop Of Shinde Vs Thackeray Fight For Shivsena )

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये, अशी सूचना दिली होती.

दरम्यान, त्यांच्या या सूचनेवरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. एका युजरने, “राजसाहेब दर सहा-आठ महिन्यांनी भूमिका बदलतात, ते पाहता उद्या मूड झालाच तर कदाचित उद्धव यांना पाठिंबा पण देऊन टाकतील. तीच एक भूमिका घेणे आता बाकी राहिले आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर दुसऱ्या एका युजरने, (संदीप) देशपांडे, (गजानन) काळे आणि शालिनीताई (ठाकरे) यांना आवरा,” असा सल्ला दिला आहे. तसेच आणखी एका युजरने, मी तुमचा मोठा चाहता आहे पण एकदा घेतलेली भूमिका बदलू नका म्हणजे झालं,” असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच “लवकरच पलटी मारणार म्हणजे,” अशीही प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली आहे.

अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT