Raj Thackeray Raj Thackeray
महाराष्ट्र बातम्या

मनसे पाडवा मेळावा : राज ठाकरे यांच्या भाषणातील नऊ महत्त्वाचे मुद्दे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तब्बल दोन वर्षांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. तसेच भाजपची स्तुती केली. त्यांनी केलेल्या भाषणातील काही मुद्दे...- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्रिपद महाराष्ट्राचे मग चर्चा चार भिंतीत का केली, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

  • हिंदू दंगलीच्या वेळेस हिंदू होतो. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीन विरुद्धच्या युद्धात काय होतो, माहिती नाही. आम्ही कधी हिंदू होणार? माहिती नाही. जातिपातीत काय ठेवले आहे.? हिंदू म्हणून राहण्याची गरज आहे. पहिले जात नव्हती का? तर होती. त्याचा अभिमान होता. मात्र, आता जातीवरून राजकारण केले जात आहे.

  • बाबासाहेब पुरंदरे नेहमी सॉफ टार्गेट होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चांगला अभ्यास केला. मात्र, त्यांच्या नेहमी विरोध करण्यात आला. कारण, ते ब्राह्मण होते म्हणून...

  • महाराष्ट्रात नोकरी देताना मराठी तरुणांना प्राधान्य दिले पाहीजे. येथील नोकऱ्यांवर मराठी तरुणांचा पहीला अधिकार आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय व्हायला नको.

  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. राजकारण करून काय मिळणार आहे. महाराष्ट्रातील पोलिसांचे कौतुक. आपल्याला कोरोना होईल याची भीती न बाळगता कोरोना काळात सेवा दिली.

  • झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर ईडीने खरं तरं धाडी टाकायला हवी. पोलिसांना विचारा त्यांच्याकडून खूप काही माहिती होईल. त्यांच्याकडे अनेक माहिती आहे. बरेच काही बाहेर येईल.

  • मशिदीवरील भोंगे काढा. आमचा प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, भोंगे काढावेच लागतील. धर्म तयार झाला तेव्हा लाऊडस्पिकर होता का? सरकारने हा निर्णय घेतलाच पाहीजे. अन्यथा भोंग्यांविरोधात दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावा. धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे.

  • उत्तर प्रदेशमध्ये चांगला विकास झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना झारखंड, बिहार आदींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. यामुळे महाराष्ट्रावरील ताण कमी होणार होता.

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून टीका. आमदारांना घर द्यावं, फार्महाऊस घ्यावं. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करा

  • पहाटे घेतलेल्या शपथविधीवरून अजित पवार यांची केली नक्कल. कोणासोबत पळाली आणि लग्न कोणासोबत केलं हेच कळेना

  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका. जातीपातीच राजकारण सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT