Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : 'कोरोनामध्ये तर एवढी माणसं गेली...'; खारघर दुर्घटनेवर राज ठाकरे स्पष्टच बोलले

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, वरळीतील बीडीडी चाळीतील नागरिकांच्या पूनर्विकाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिथे नक्की काय होणार, याची माहिती रहिवाशांना नाही. सरकारने ती द्यावी, अशी मागणी केली आहे. घरं कशी असणार?, शाळा होणार का?, स्पेस किती असेल? याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितंल.

पुढे बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, नवी मुंबईतील सिडकोच्या लॉटरीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तसेच पोलिसांच्या घराच्या मुद्द्यासंदर्भात मागणी केली. पोलिसांना १५ लाखांत घरं देण्याचा करार करा, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

खारघर दुर्घटनेबद्दल राज ठाकरे यांना विचारलं असता, ते म्हणाले की, तो एक अपघात होता. त्याचं राजकारण करु नये. अपघाताचं काय राजकारण करायचं? तसंच म्हटलं तर मग कोरोनामध्ये एवढी माणसं गेली. त्या प्रकरणातसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल, असं राज म्हणाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली आहे. त्याला राज यांनी अपघाताचं राजकारण करु नये, असं उत्तर दिलं आणि तो कार्यक्रम राजभवना घेता आला असता, असंही राज म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधान मोदींचे कट्टर समर्थक शहजाद पूनावाला यांचा भाजपचा राजीनामा; राष्ट्रीय प्रवक्त्याने पक्ष का सोडला?

Bhiwandi Building Collapse: आम्ही बाहेर पडलो, पण आमची लेक ढिगाऱ्याखालीच अडकली अन्..., भिवंडी दुर्घटनेतील पीडितांनी सांगितला थरार!

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग वाढवला; मुठा नदी पात्रात १६२४७ क्युसेक विसर्ग

Nagpur Accident News: भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू; नवरगाव शिवारातील घटना; मद्यधुंद चालक अटकेत

SCROLL FOR NEXT