Raj and Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav And Raj : ठाकरे बंधू एकत्र येणार ? वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंनी केलं सूचक वक्तव्य !

सध्याच राजकारण हे पुतण्यांच : प्रत्येक पक्षातील पुतणे कोणीतरी गोळा करत आहे

सकाळ डिजिटल टीम

Uddhav And Raj । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रंगल्या आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ राजकारणात एकत्र आले पाहिजेत असे मत कित्येक शिवसैनिक व मनसैनिक व्यक्त करत आहेत. याच प्रश्नाला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

आवाज कोणाचा या पॉडकास्ट मध्ये संजय राऊत यांना मुलाखत देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मधल्या काळात आम्ही दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र त्या आता बंद झाल्या आहेत. सध्याच राजकारण हे पुतण्यांचे राजकारण झाले आहे. पुतणे गोळा करण्याचं काम कोणीतरी करत आहे. प्रत्येक पक्षातील पुतणे कोणीतरी गोळा करत आहे.

याचबरोबर संजय राऊत यांनी जर ते पुढे आले तर तुम्ही एकत्र याल का? असा प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आला तर, गेला तर याचा विचार करत नाही. लोक येत जात असतात. मी त्या त्या वेळी काय करायचं हे ठरवतो. यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे बंधु एकत्र येण्याची शक्यता ना नाकारली, ना त्याला होकार दिला,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT