Raj Thackeray ultimatum to state government till May 3 to remove loudspeakers on mosques
Raj Thackeray ultimatum to state government till May 3 to remove loudspeakers on mosques  
महाराष्ट्र

३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा…; राज ठाकरेंचा अल्टिमेटम

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : पाडवा मेळव्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदिवरील भोंग्यावरुन घेतलीली भूमिका चांगलीच गाजली होती राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले होते. दरम्यान राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील उत्तर सभेत बोलताना सरकारला अल्टिमेटम देत ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवा, हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे असे सांगत आमची भूमिका मागे घेणार नाही असे स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मशिदिवरचे भोंगे काढा हे मी आधिच सांगितंल होतं. पण ऐकू नाही आलं. याचा देशाला त्रास होतोयहा धार्मिक विषय कुठं आहे, प्रार्थना तुमची आहे आम्हाला कशाला ऐकवताय. तुम्हाला सांगून जर कळत नसेल की आम्हाला त्रास देऊ नका, तर तुमच्या मशिदी बाहेर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार. देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, तुमच्या मशिदीबाहेर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, ३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT