Raj Thackeray Narendra Modi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : 'शिवतीर्था'वर घुमणार PM मोदींचा आवाज; राज ठाकरेंना भाजपाकडून विशेष भेट

विदर्भ दौऱ्यावर राज ठाकरेंनी अनेक भाजपा नेत्यांची भेट घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी तिकडच्या भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. पक्ष बांधणीसाठी सक्रिय झालेल्या राज ठाकरे यांना भाजपाकडून एक विशेष भेट मिळाली आहे. त्यामुळे आता शिवतीर्थावर पंतप्रधान मोदींचा आवाज घुमणार आहे.

चंद्रपूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांना भाजपा नेते आणि राज्याचे वने, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक खास भेट दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंना एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करुन दिलं आहे. शिवाय सोबत राष्ट्रध्वजाचं एक चिन्हंही आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींचं रेकॉर्डेड भाषण ऐकू येतं. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रोज मोदींचं भाषण ऐकू येणार आहे.

विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे अनेक भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेताना दिसून आले. नागपुरात नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली. तसंच मनसेच्या पुनर्बांधणीविषयीच्या महत्त्वाच्या घोषणाही त्यांनी यावेळी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

SCROLL FOR NEXT