Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

"दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया, पण..."; राज यांचा पुन्हा इशारा! उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत स्पष्ट सांगितलं

Raj Thackeray's Clear Warning : राज ठाकरे पुढे म्हणाले, "मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली.

Sandip Kapde

शनिवारी शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शाबासी दिली आणि अभिनंदन केले होते. मनसेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे आणि सांगितले की, यापूर्वी शिवसेनेच्या सदस्यांनी राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपारी फेकली होती. दरम्यान या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे यांची भूमिका

राज ठाकरे यांनी या घटनेवर भूमिका स्पष्ट करताना म्हटले, "काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान धाराशिवपासून सुरु झालेल्या विघ्न उभ्या करण्याचे प्रयत्न होते. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. परंतु पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता, ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते."

शिवसेना (यूबीटी) विरोधात तीव्र प्रतिक्रिया

राज ठाकरे पुढे म्हणाले, "मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली. महाराष्ट्रात राजकीय व्यवस्थेचं कमी होत आहे. राजकारणात मुद्यांची लढाई आलीच पाहिजे, परंतु कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामध्ये विध्न निर्माण करणं हे थांबलं पाहिजे."

राजकीय तणाव -

राज ठाकरे यांनी माध्यमांना देखील सुचवले की, "लोक म्हणतील तुम्ही मुद्द्याचं बोलताय, गुद्दे देताच की... हो आम्ही देतो गुद्दे, परंतु महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी. आपल्याकडून राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ न देण्याची संस्कृती टिकवूया. काही पत्रकार आणि नेते आर्थिक हितसंबंधांसाठी समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका."

महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिलेत आणि यापुढे देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका.

शांतता राखण्याचे आवाहन

राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत सांगितले, "जशास तसे उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल दाखवलीत. त्यामुळे सगळं थांबवा आणि महाराष्ट्रात शांतता नांदू देऊया. या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे  हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

Pune News : सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की? भेकराईनगर गोशाळा येथील प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT