महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : राज ठाकरे यांचा प्रचार 'लकी नऊ'पासून सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या नऊ तारखेपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करणार आहेत. ठाण्यात पक्षाची पहिली प्रचार सभा होईल. 

पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर नऊ निवडला आहे. राज नऊ हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ या नंबरभोवती फिरताना दिसतात. राज ठाकरे किंवा मनसेचा नऊ नंबरवर दृढ विश्वास असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवसेना सोडण्यापासून ते मनसेच्या घोषणेपर्यंत, गाडीच्या नंबरपासून ते विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यापर्यंत सर्वत्र नऊ हाच नंबर दिसतो. उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. 

मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली ती 27 उमेदवारांची. त्यामुळे 2+7 =9 इथेही नऊचे गणित जुळून येते. दुसरी उमेदवार यादी 45 उमेदवारांची आहे, नऊ तारखेला ठाण्यातून प्रचाराला सुरवात, असा सर्व या अंकाशी मेळ घातल्याचे दिसून येते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

Shahid Afridi चा 'Hilal-e-Imtiaz' पुरस्काराने गौरव; म्हणाला, हा पाकिस्तानसाठी शत्रूविरुद्ध लढणाऱ्या हुतात्म्यांना समर्पित... Video

Chemical Leak : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पाइपलाईनला पुन्हा गळती; नवापूरकरांचा आरोग्यधोक्यावर संताप

SCROLL FOR NEXT