Raj Thackrey on Alliance Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackrey on Alliance: 'आम्ही युतीसाठी प्रस्ताव...', ठाकरे गट-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणं निर्माण झाली. तर राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, 'युतीसाठी मनसेकडून ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही' असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.(Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फुट पडली त्यानंतर आता मनसेकडून हा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.(Latest Marathi News)

तर दैनिक सामनाच्या कार्यालयात अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्याचबरोबर राऊत आणि पानसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.(Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT