Raj Thackrey in Mahayuti Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackrey in Mahayuti: ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ सामना भाजपसाठी लाभदायक? निवडणुकीतील रणनीतीबाबत साशंकता; उद्धव ठाकरेंना नमविण्याचे लक्ष्य

Raj Thackrey in Mahayuti: राज ठाकरे यांना महायुतीसह घेऊन मुंबईत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ अशी लढाई करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, राज ठाकरे यांना बरोबर घेतल्यामुळे भाजपचा फायदा होणार की तोटा, याबाबतही राजकीय निरीक्षक संभ्रमात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद अगदीच नगण्य असली तरी राज ठाकरे यांना महायुतीसह घेऊन मुंबईत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ अशी लढाई करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचवेळी गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून भाजपविरुद्ध आक्रमकपणे बोलणारा एक आवाज बंद करण्याची रणनीतीही यामागे आहे. राज ठाकरे यांना बरोबर घेतल्यामुळे भाजपचा फायदा होणार की तोटा, याबाबतही राजकीय निरीक्षक संभ्रमात आहेत.

उत्तर प्रदेशानंतर लोकसभेच्या अधिक जागा असलेले महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर राज्यातील ४८ पैकी ४२ जागा भाजपकडे होत्या. महाविकास आघाडी आकाराला आल्यानंतर ते गणित बिघडले. आधी शिवसेनेत, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आली.

दोन प्रमुख पक्ष फोडल्यानंतरही अपेक्षित बेरीज होत नसल्याचे दिसू लागल्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि अमित शहा यांच्या निरोपावरून राज ठाकरे दिल्लीला जाऊन आले.

त्यासंदर्भातील मनसेची भूमिका एक-दोन दिवसांत जाहीर होईल. लोकसभेची एक किंवा दोन जागा मनसेला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मनसे महायुतीत सहभागी होणे ही केवळ औपचारिकता असल्याचे मानले जाते.

भाजपची खेळी

राज ठाकरे यांचा भाजपला प्रत्यक्षात किती उपयोग होईल, यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा करण्यासाठी एक ठाकरे आपल्याकडे घेतला एवढाच मर्यादित त्याचा अर्थ आहे. राज ठाकरे यांना दिल्लीला आणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज ‘प्रतीक्षालयात’ बसविण्याचा आनंद भाजपच्या नेत्यांनी अनुभवला तो वेगळाच. ४० आमदार फोडल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपद काढू घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे आक्रमकपणे बोलत आहेत. भाजपला त्यांना निवडणुकीच्या मैदानात नमवायचे आहे. त्यासाठी राज ठाकरे यांची मदत होऊ शकेल. त्यासाठी मुंबईत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ अशी लढाई उभी केली आहे.

मुंबईतील मतपेढी

मुंबईतल्या पाच मतदारसंघांमध्ये फायदा व्हावा, या प्रमुख उद्देशाने भाजपला राज ठाकरे यांना बरोबर घ्यावयाचे आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईतील २५ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली होती आणि त्यांना साडेचार लाखांहून अधिक मते मिळाली होती. पैकी सर्वाधिक सव्वा लाख मते उत्तर पूर्व मतदारसंघातील मुलुंड, विक्रोळी, भांडूप, घाटकोपर परिसरात मिळाली होती. याच लोकसभा मतदारसंघामध्ये २००९ मध्ये मनसेच्या शिशिर शिंदे यांना एक लाख ९५ हजार १४८ मते मिळाली होती. यंदा भाजपने मिहीर कोटेचा यांना येथून उमेदवारी दिली आहे.

फायदा -तोट्याबाबत साशंकता

राज ठाकरे यांची परप्रांतियांबाबतची भूमिकेने उत्तर भारतीय मतदार भाजपपासून दुरावू शकतो

मशिदीवरील भोंग्यांवरून त्यांनी घेतलेली भूमिका

महाविकास आघाडीने समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्या सभा मुंबईत ठेवल्यास त्याचा निश्चित परिणाम होऊ शकतो

मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास मराठी मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होत असे

मनसे यावेळी भाजपसह आल्यास त्यांच्या मतांची भाजपच्या बाजूने बेरीज होणार की ती शिवसेनेकडे जाणार, असा प्रश्न राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत

मनसेची निवडणुकीतील वाटचाल

मनसेने पहिल्यांदा २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली

पक्षाचे १४३ उमेदवार उभे केले होते, त्यापैकी १३ उमेदवार निवडून आले

एकूण २५ लाख ८५ हजार ४९८ मते उमेदवारांना मिळाली आणि मतांची टक्केवारी होती ५.७१ टक्के

उमेदवारांपैकी निवडून येण्याचे प्रमाण होते नऊ टक्के

मनसेमुळे शिवसेनेचे ११उमेदवार पराभूत झाले होते

राज ठाकरे यांचा करिष्मा होताच, पण त्यावेळची मनसेची निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुरस्कृत केल्याची चर्चा

मनसेच्या वाटचालीतील आजवरचे हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल

भूमिकेतील सातत्याचा अभाव आणि संघटना बांधणीच्या अभावामुळे नंतरच्या काळात मनसेची सर्व आघाड्यांवर घसरण झाल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT