राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज  sakal
महाराष्ट्र

Rajarshi Shahu Maharaj : मुलाच्या मृत्यूनंतर ऐश्वर्याचा त्याग केला; कसे होते शाहू महाराजांचे शेवटचे दिवस

वैष्णवी कारंजकर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी निधन झालं. आज शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी सोसलेल्या शारिरीक मानसिक वेदनांविषयी 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज' या पुस्तकात लिहिलं आहे.

ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहू महाराजांच्या अखेरच्या दिवसांबद्दल लिहिलं आहे. बलदंड शरीरयष्टी असलेल्या शाहू महाराजांना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता. त्यातच आपला धाकटा मुलगा प्रिन्स शिवाजी यांच्या निधनामुळे ते खचले होते.

त्यामुळे त्यांनी राजवाड्यातल्या ऐश्वर्याचा त्याग केला. आणि सोनतळी आश्रमात ते संन्याशाप्रमाणे राहत होते. अशा शारिरीक आणि मानसिक अस्वास्थ्याच्या काळातही त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.

शाहू महाराजांचे दौरे, कार्यक्रमांना जाणे, शिवाय शोषित, वंचितांसाठीचं काम सुरूच ठेवलं. मात्र प्रकृती खालावत होती. असं असतानाही ते बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातीच्या लग्नाला हजर राहिले. या लांबच्या प्रवासामुळे त्यांची तब्येत आणखी खालावली. तिकडून परतत असताना ते मुंबईत थांबले आणि ५ मे १९२२ रोजी त्यांचा हृदयविकार आणखी बळावला आणि ६ मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: कल्याण लोकसभेत सगळे रेकॉर्ड मोडा, गुलाल उधळायला मी स्वतः येणार!

Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

LED Screen Cleaning: घरगुती वस्तूंनी LED स्क्रीन करा स्वच्छ, फक्त करू नका 'या' चुका

Madgaon Express: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत

SCROLL FOR NEXT