rajesh tope Sakal media
महाराष्ट्र बातम्या

'...तर ओमिक्रॉनचा मोठा संसर्ग', राजेश टोपेंची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जगावर सध्या ओमिक्रॉनचं (Omicron Variant) संकट आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे पाच रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा (Maharashtra Omicron Cases) शिरकाव झाला आहे. त्यामुळे आरोग्यविभागाची चिंता देखील वाढली आहे. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) म्हणाले.

डोंबिवलीतील ३३ वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पण, ओमिक्रॉनला वेळवर रोखलं नाहीतर आपल्याला मोठ्या प्रमाणात संसर्गाला सामोरं जावं लागेल. ओमिक्रॉनला थांबविण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करत आहोत. पण, अद्यापही आमची टास्क फोर्ससोबत बैठक झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतल्यानंतर काय निर्णय होतात हे सांगू असेही टोपे म्हणाले.

देशात कर्नाटकात चार दिवसांपूर्वी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. पण, यापैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेत प्रवास करून आला होता, तर दुसरा रुग्ण हा बंगळुरूतील एक सरकारी डॉक्टर आहे. त्याने कुठेही प्रवास केलेला नाही. त्यामुळे त्याला कोरोना झालाच कसा? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर गुजरातमधील जामनगर येथे एक रुग्ण आढळला असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील डोंबिवली येथे एक रुग्ण आढळला आहे. आज आणखी दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला असून देशातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या पाच वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT