Rajesh Tope Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

एक पेपर सकाळी, दुसरा दुपारी ठेवा आणि हेलिकॉप्टर द्या; संतप्त उमेदवाराची मागणी

आरोग्य सेवेच्या परिक्षेत पून्हा एकदा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.

सुधीर काकडे

राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीत गेल्या महिन्यात झालेल्या गोंधळाने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. ऐनवेळी परिक्षा रद्द करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर सरकारच्या गलथान कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र आता पून्हा एकदा तोच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण रविवारी होणाऱ्या परिक्षेत देखील गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय. या परिक्षेसाठी देखील हॉलतिकीटचा घोळ कायम आहे. अशाच एका विद्यार्थ्यांनं आपल्याला दोन हॉलतिकीट मिळल्याचं सांगितलं.

"माननीय टोपे साहेब, मी राहतो पुण्यात. मी सेंटर पुणे निवडलं होतं, मात्र मला होन हॉलतिकीट आले आहेत. माझा नंबर जळगाव आणि कोल्हापूरला लागला आहे. एकाच दिवशी एकाचवेळी दोन पेपर आहेत, आता मी काय करु?" असा प्रश्न अक्षय दिघे या विद्यार्थ्यानं विचारलाय.

तसंच पुढे तो विद्यार्थी असंही म्हणाला की, "एक काम करा, एक पेपर सकाळी व दुसरा दुपारी ठेवा आणि मला एक हेलिकॉप्टर द्या, म्हणजे मी दोन्ही पेपर देऊ शकेल." परिक्षेच्या या गलथान कारभारावरून आपल्यावा हसावं की रडावं हे देखील कळत नसल्याच्या भावना या विद्यार्थ्यांनं व्यक्त केल्या.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या या परिक्षेसाठी बहुतेकांना दोन वेगवेगळ्या केंद्राचे हॉलतिकीट मिळाले, तर काहींना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT