Rajesh Tope ordered to prepare action plan on health issues of transgender citizens टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

'तृतीयपंथीयांबाबत सरकारचा मोठा निर्णय; राजेश टोपेंनी दिल्या सूचना

सकाळ डिजिटल टीम

तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) नाकरिकांच्या हक्कांसाठी समाजात वेगवेगळ्या पातळीवर काम सुरु आहे, तृतीयपंथीयांकडे समाजात नेहमीच वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मात्र आता राज्य सरकार ट्रान्सजेंडर (Transgender) नाकरिकांना चांगल्या आरोग्यसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून ट्रान्सजेंडर नाकरिकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात एक महत्वाची बैठकी घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची सूचना केली आहे.

टोपे यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्रान्सजेंडर नागरिकांबद्दलच्या आरोग्यच्या प्रश्नांवर आज एक बैठक घेतली. तसेच या बैठकीतली चर्चेनंतर त्यांनी ट्रान्सजेण्डर नागरिक हे आपल्या समाजाचाच एक भाग आहेत आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता आले पाहिजे, असे माझे मत असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच ट्रान्सजेंडर नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ट्रान्सजेंडर नागरिकांच्या आरोग्य समस्या या बाबत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच टोपे यांनी ट्रान्सजेंडर नागरिकांना लिंग बदल शस्त्रक्रिया, लेसर आणि संप्रेरक उपचार एकाच हे सर्व ठिकाणी उपलब्ध व्हावे त्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना देखील दिल्याचे त्यांनी सांगितले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT