महाराष्ट्र बातम्या

हिंगोली ते दिल्ली, जाणून घ्या राजीव सातव यांचा राजकीय प्रवास

नामदेव कुंभार

Congress MP Rajiv Satav : काँग्रेसचे सरचिटणीस (General Secreataty of Congress) नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात (Jehangir hospital Pune) उपचार सुरु होते. अवघ्या 46 व्या वर्षी राजीव सातव (Congress MP Rajeev Satav)यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांना गांधी कुटुंबीयांच्या जवळील मानलं जातं होतं. राहुल गांधी(Rahul Gandhi), सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचे विश्वासू म्हणून राजीव सातव यांना ओळखलं जायचं. राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य मानले जातात.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली होती. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जहांगीर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

राजकीय प्रवास-

काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री रजनीताई सातव यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी पुण्यात फर्गुसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केलेले आहे. त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव डॉक्‍टर आहेत. 2009 ते 2014 या काळात राजीव सावत हिंगोलीचे आमदार होते. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ते 2008 ते 2010 या काळात अध्यक्ष होते. तर 2010 ते 2014 या काळात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. 2014 च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT