cm eknath shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rajkot: राजकोट घटनेतील दोषींवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या; नवीन पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात

पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीची घोषणा करण्यात आली आहे. कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुतळा कोसळण्यामागील कारणांचा शोध घेणार आहे. तसेच या दुर्घटनेला जबाबदार कोण? याची दोष निश्चितीही करणार आहे. समितीने याबाबतचा अहवाल तत्काळ सरकारला सोपवावा असे सार्वजनिक विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईः मालवण येथील राजकोट किल्ल्याजवळ बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारने आता पुन्हा नव्याने हा पुतळा उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे.

त्याचबरोबर पुतळा का कोसळला? त्याला जबाबदार कोण? हे निश्चित करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचे आदेश आज सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत. नवीन पुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

हा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीची घोषणा करण्यात आली आहे. कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुतळा कोसळण्यामागील कारणांचा शोध घेणार आहे. तसेच या दुर्घटनेला जबाबदार कोण? याची दोष निश्चितीही करणार आहे. समितीने याबाबतचा अहवाल तत्काळ सरकारला सोपवावा असे सार्वजनिक विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या समितीमध्ये बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी स्ट्रक्चरल डिझाईन मुख्य अभियंता विकास रामगुडे, अभियंता प्रा. जांगीड, प्रा. परीदा यांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोनच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नव्याने पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार नवीन पुतळा उभारण्यास वाव, संकल्पना, कार्यपद्धत निश्चितीसाठी शिफारशी करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.

निमंत्रितांमध्ये जयसिंगराव पवार
मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, नौदलाचे प्रतिनिधी कमांडर एम. दोराईबाबू, अभियंता प्रा. जांगीड, प्रा. परीदा, जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे संचालक राजीव मिश्रा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व मराठा आरमाराचे अभ्यासक राजे रघुजी आंग्रे, इतिहासकार जयसिंगराव पवार आणि इतर विशेष निमंत्रितांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : संपूर्ण राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT