Raju Shetty Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetti : जिथं दर मिळेल तिथेच ऊस नेणार; राजू शेट्टींचे सरकारला आव्हान

रवींद्र देशमुख

मुंबई : राज्याबाहेर ऊस नेण्यास यंदा राज्य सरकारने बंदी घातली आहे. अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यानरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयावर त्यांनी कडाडून टीका केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, वास्तविक पाहता महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून हिशोब घेण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र सरकार हिशोब घेत नाही. एका बाजुला कारखानादारांचे लाड करण्यात येत आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना दुसऱ्या राज्यात ऊस देण्यास बंदी घालण्यात येत आहे. मोदी सरकारचे देखील वन नेशन वन मार्केट धोरण आहे. तरी आपल्याच नेत्याच्या धोऱणाला छेद देऊन असा निर्णय घेणं म्हणजे साखर कारखानदारांच्या दाढ्या कुरवळ्याचा प्रयत्न असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

दरम्यान आम्हाला चांगला दर जिथं मिळेल तिथं आम्ही ऊस देणार आहोत. आम्हाला अडवून दाखवा असा इशारा शेट्टी यांनी दिला.

यंदाच्या हंगामात गळीत हंगाम जेमतेम अडीच ते तीन महिने सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणूनच सरकारने राज्याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्यास बंदी घातली आहे. राज्यातील साखर उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहावा यासाठी सहकार कायद्यातील ऊस नियंत्रण तरतुदीनुसार ही बंदी घातली आहे.

कर्नाटकातील गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उसाची पळवा पळवी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT