Raju Shetti
Raju Shetti  esakal
महाराष्ट्र

आता फक्त मरण स्वस्त, त्याला कधी GST लावता? राजू शेट्टींचा केंद्राला खोचक सवाल

धनश्री ओतारी

केंद्र सरकारने मागच्या दोन दिवसांपूर्वी गहू, तांदूळ, तृणधान्ये, सोयाबीन, मटारावर ५ टक्के जीएसटी लागू केल्याचा निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता फक्त मरण स्वस्त आहे. त्याला कधी जीएसटी लावता? असा सवाल करत केंद्राला खोचक सवाल केला आहे.(Raju Shetti Modi government Nirmala Sitharaman over 5 GST)

पेट्रोल-डिझेल-गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेरचे, दवाखाना परवडत नाही, तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके साऱ्यानाच जीएसटी... आता स्वस्त आहे फक्त मरण त्याला केव्हा लावता जीएसटी ? अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पॅकबंद आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार यांसारख्या उत्पादनांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला. तर गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बदल आजपासून प्रभावी झाला आहे.

कोणत्या वस्तू महागल्या?

18 जुलैपासून टेट्रा पॅक दही, लस्सी आणि बटर मिल्कवर 5% दराने जीएसटी लागणार आहे. आतापर्यंत यावर जीएसटी आकारला जात नव्हता.

5000 रुपयांपेक्षा जास्त भाडे (नॉन-ICU) असलेल्या रुग्णालयातील रुम्सना आता 5% कर भरावा लागेल.

जीएसटी कौन्सिलने दररोज 1000 रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल रुम्सवर 12% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे, जे अजूनही जीएसटीच्या कक्षेबाहेर होते.

एलईडी लाईट्स, एलईडी दिव्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक-सर्व्हर्स इत्यादींवर आता 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के दराने जीएसटी लागू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Payment: झोमॅटो पेमेंट होणार बंद; कंपनीने RBIला परत केला परवाना, काय आहे कारण?

Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सोडून राजकारणात, ५ वेळा अटक,  बिहारमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा कसे बनले सुशील मोदी?

IPL 2024 : नाद करा पण आमचा कुठं! RCBनं विजयाचा 'पंच' मारला तरी कसा? संघाच्या हुकमी एक्क्यानेच केलाय खुलासा

Video Viral: लालू प्रसाद यांच्या मुलाने आपल्याच कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं खाली; व्हिडिओ होतोय व्हायरल...

SCROLL FOR NEXT