Raju Shetty esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात का वाजत आहेत 'भोंगे'? राजू शेट्टींनी सांगितलं कारण

हेमंत पवार

'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरलं आहे.'

कऱ्हाड (सातारा) : महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार (Central Government) तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं अपयश यावर चर्चा नको, म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असं स्पष्ट मत माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज (कऱ्हाड) व्यक्त केलं.

बळीराजा उध्दार यात्रेनिमित्त राजू शेट्टी शनिवारी कऱ्हाडला (जि. सातारा) आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानीचे सचिव राजेंद्र गड्डेनवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार (Maharashtra Government) अपयशी ठरलं आहे. शेतकऱ्यांवर गेल्या दोन वर्षात महापूर, कोरोनासह अनेक आपत्ती आल्या. त्यामध्ये पीक विमा योजना राबवणाऱ्या कंपन्या कर्जबाजारी होवून दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या.

मात्र, त्याच कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय. केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं अपयश यावर चर्चा नको म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असं स्पष्ट मत शेट्टींनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT