Priyanka Chaturvedi  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rajya Sabha : आता राज्यसभेत "No Sir" म्हणायचं नाही, सेना खासदाराच्या मागणीला यश

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मागणीला राज्यसभा सचिवालयाने मान्य केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gender Neutral Language : शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मागणीला राज्यसभा सचिवालयाने मान्य केले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या कामकाजादरम्यान कानावर पडणारा 'नो सर' हा शब्द येथून पुढे ऐकू येणार नाहीये. चतुर्वेदी यांच्या मागणीनंतर राज्यसभा सचिवालयाने या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रियंका यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्राला देण्यात आलेल्या उत्तरात हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात चतुर्वेदी यांनी 'नो सर' सारख्या वाक्यांचा वापर बदलण्याची मागणी केली होती. जो अनेकदा सभागृहात उत्तरावेळी बोलला जात होता. ८ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात पुरुषप्रधान असलेला हा शब्द बदलावा अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली होती.

'छोटे पाऊल, मोठा फरक'

दरम्यान, राज्यसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'छोटं पाऊल, मोठा फरक. मंत्र्यांपासून महिला खासदारांपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे देताना, संसदेतील पुरुषप्रधान शब्द दूर केल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाचे आभार त्यांनी मानले आहे.

जेंडर न्यूट्रल असणार संसदीय प्रश्नांची उत्तरे

प्रियांका चतुर्वेदी यांच्या पत्रावर राज्यसभा सचिवालयाने उत्तर दिले आहे की, राज्यसभेतील अधिवेशन आणि कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांनुसार, सभागृहाचे सर्व कामकाज सभापतींना संबोधित केले जाते आणि संसदीय प्रश्नांची उत्तरे देखील कार्यवाहीचा एक भाग आहेत. मात्र, राज्यसभेच्या पुढील अधिवेशनापासून संसदीय प्रश्नांची उत्तरं जेंडर न्यूट्रल देण्याचे मंत्रालयांना सूचित केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT