rajya sabha election 2022 ed opposes anil deshmukh nawab malik applications seeking one day bail to vote
rajya sabha election 2022 ed opposes anil deshmukh nawab malik applications seeking one day bail to vote 
महाराष्ट्र

देशमुख, मलिकांच्या मतदानाचं काय?अधिवक्त्यांनी कोर्टात मांडला महत्वाचा मुद्दा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणूकीबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक व अनिल देशमुख यांना या निवडणूकीत मतदान करता यावे यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी सुरू आहे. (rajya sabha election 2022 ed opposes anil deshmukh nawab malik applications seeking one day bail to vote)

दरम्यान महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अर्जाला विरोध केला असून या प्रकरणात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) अनिल सिंग म्हणाले की, या दोन वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, एक प्रतिबंधात्मक आणि दुसरे न्यायालयीन आदेशामुळे तुरुंगात आहेत. प्रतिबंधांत्मक प्रकारात तुमच्याजवळ वेगवेगळे वैधानिक अधिकार आहेत आणि तुरुंगात तुम्हाला मर्यादांसह वेगवेगळे अधिकार मिळतात. तसेच तुरूंगात तुमचे काही अधिकार नाकारले जातात.

यावेळी एएसजी यांनी सुप्रिम कोर्टाच्या काही आदेशांचा हवाला दिला, ज्यात असे म्हटले आहे की, राज्यसभा निवडणुकीत मतदान करणे हा मूलभूत अधिकार नाही. पुढे ASG अनिल सिंग यांनी असा युक्तिवाद केला की, हे प्रकरण लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 62(5) अंतर्गत येते. जर तुरुंगात असलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी किंवा विधानसभा आणि लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्याची परवानगी असेल, तर त्याला या प्रकरणात पाहीले जाऊ शकत नाही, कारण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड वेगळ्या कायद्याच्या आधारे केली जाते.

त्याच वेळी विधानसभा आणि लोकसभेच्या कामकाजात लोक प्रतिनिधी कायद्याची गरज नाही, तर राज्यसभेच्या निवडणुका या पूर्णपणे लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत घेतल्या जातात.त्यामुळे हे प्रकरणा या कायद्यांतर्गत पाहिले गेले पाहिजे. दरम्यान जेष्ठ वकील अमित देसाई यांनी नवाब मलिक यांची बाजू न्यायालयात मांडली.

विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)चे नेते अनिल देशमुख (71), ज्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यांना शहरातील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मनी लाँड्रिंगचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहे. तर दुसरीकडे दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी कुर्ला, मुंबई येथे असलेल्या मुनिरा प्लंबरची 300 कोटींची जमीन 30 लाख रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये देखील 20 लाखांचे पेमेंट केले गेले आहे .

या जमिनीच्या मालकाला एक रुपयाही दिला नाही. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या नावावर पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे ही जमीन करण्यात आली होती. त्यानंतर ही जमीन नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्या नावावर झाली. त्या बदल्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या खात्यात पन्नास लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT