Raj Sabha Election 2024 
महाराष्ट्र बातम्या

Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? २७ फेब्रुवारी रोजी आहे मतदान

Rajya Sabha Election Latest News : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्यातील 6 जागांसाठी ही निवडणूक होणार असून यासाठी येत्या 28 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

रोहित कणसे

Rajya Sabha Election Latest News : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्यातील 6 जागांसाठी ही निवडणूक होणार असून यासाठी येत्या 2७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

देशातील १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ६ राज्यसभा खासदारांचा देखील कार्यकाळ पूर्ण होत आहे. यानंतर येत्या २७ तारखेला राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल देखील जाहीर केला जाईल.

राज्यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्यासह व्ही व्ही मुरलीधरन हे भाजपचे खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई तर काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हान याचा कार्यकाळ संपत आला आहे. याजागी आता कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून राज्यसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. १३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य ३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत.

या राज्यात होणार निवडणूका

ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT