Jayant Patil vs Sujay Vikhe Patil ESakal
महाराष्ट्र बातम्या

'ठिणगी कोणी लावली? आगीत कोण जळतंय, शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म'

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेनं संभाजीराजेंना धक्का देत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय.

नगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापू लागलंय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगत असताना भाजप (BJP) नेते खासदार सुजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा जन्म हा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (Shiv Sena) संपवण्यासाठी झालेला आहे. राजेंच्या (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati) उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरू असताना या विषयाची सुरुवात कोणी केली. याला ठिणगी कोणी लावली आणि आज आगीत कोण जळतंय हे सर्व महाविकास आघाडीचं चित्र जनता पाहत असल्याचं खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी म्हटलंय.

संभाजीराजे छत्रपती यांना ‘आधी शिवसेना प्रवेश मगच राज्यसभेची संधी’ या ऑफरवर शिवसेना ठाम राहिली. दुसरीकडं संभाजीराजे शिवसेनेत जाण्यास नकार देत अपक्ष उमेदवार म्हणूनच लढण्यावर ठाम राहिले. अखेर शिवसेनेनं त्यांना धक्का देत आपले कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी जाहीर केलीय. यानंतर सुजय विखेंनी राष्ट्रवादीवर टीका केलीय. खासदार सुजय विखे म्हणाले, शिवसेना हा पक्ष गेल्या 3 वर्षात फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीपूर्वीच त्यांना पाठिंब्याची घोषणा केली. त्यापूर्वी हा विषय चर्चेत देखील नव्हता. पाठिंब्याची घोषणा करून हा विषय चर्चेला आणला आणि तो विषय सेनेकडं वळविण्यात आला.

सूजय विखे पुढं म्हणाले, आज जिथून या चर्चेला सुरुवात झाली ज्या व्यक्तींनी या चर्चेला वाचा फोडली त्यांच्यावर आज कुठलाच आरोप नाहीय. सगळा दोष हा शिवसेनेला दिला जात आहे, असं विखेंनी नमूद केलंय. राज्याच्या निधी पैकी ७६ टक्के बजेट हे राष्ट्रवादी घेत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून त्यांना निधी नाही फक्त टीकेचा धनी, त्रासाचा धनी त्यांना केलं जात आहे. तरी देखील सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाही ही खूप मोठी शोकांतिका असल्याचंही विखे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Contamination : ...तर वाचला असता निष्पाप बालकांचा जीव; कफ सिरप कंपनीने केले ३५० बाबींचे उल्लंघन, अहवालात धक्कादायक माहिती समोर

Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?

Fadanvis Interview: फडणवीस एका दिवसासाठी फिल्म दिग्दर्शक बनले तर? आवडत्या सिनेमानेच त्यांना आणलं होतं अडचणीत, म्हणाले, 'जेव्हा मी...'

Cough Syrup Ban : कफ सिरपवर केंद्राची बंदी; २ वर्षांखालील मुलांना औषध न देण्याचे कठोर निर्देश

Latest Marathi News Live Update : "माझ्यावरचा हल्ला राजकीय स्टंट!": बापूसाहेब पठारे यांचा बंडू खांदवे यांच्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT