Chandrakant Patil latest news sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपच्या चंद्रकात पाटलांचं मोठं वक्तव्य

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्यानं भाजपने नवी खेळी खेळली आहे

सकाळ डिजिटल टीम

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्यानं भाजपने नवी खेळी खेळली आहे

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. एक बाजूला महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भाजप या दोन्ही पक्षात राजकारण रंगणार असल्याचे संकेत दिसत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे घोषित केल्यानंतर त्यांनी इतर पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मात्र आता संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. या सगळ्या राजकारणात आता भाजपने राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) तिसऱ्या जागेसाठी तयारी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकारणाला रंग चढणार असल्याची चर्चा आहे. (Chandrakant Patil latest news)

भाजपने राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी तयारी सुरू असली तरी यावर अंतिम निर्णय अजूनही झालेला नसल्याची माहिती शनिवारी पक्षाकडून देण्यात आली आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसरीकडे भाजप तिसऱ्या जागेसाठी कोणाची निवड करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या विषयावर भाजपाच्या बड्या नेत्यांनीही महत्वाची वक्तव्य केली आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासंदर्भात म्हणाले, राज्यसभा निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार देण्याबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतलेला नाही. भाजप कोणतीही निवडणूक हरण्यासाठी लढत नाही. आम्हाला ज्यावेळी अंदाज येईल, त्यावेळी आम्ही विचार करू. सध्या आमच्याकडे ३१ मते आहेत. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे कोटा ४१ वर येईल. त्या परिस्थितीतही आम्हाला १० मतेच कमी पडत आहे. घोडेबाजार न करता आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. ३१ मते आणि इतर १० मते घेऊन तिसरी जागा लढायची की नाही याचा निर्णय अद्याप आम्ही घेतलेला नाही. याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करते, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, जर यासाठी केंद्राने परवानगी दिली, तर आम्ही ही जागा निश्चितच जिंकून दाखवू. दरम्यान, दरम्यान, या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३१ मे आहे. दोन जागांपैकी पहिल्या जागेसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे नाव निश्चित मानले जात असून, दुसऱ्या जागेसाठी भाजपमध्ये विनय सहस्रबुद्धे, राम शिंदे, अनिल बोंडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT