MLA Devendra Bhuyars  Sakal
महाराष्ट्र बातम्या

राऊत ब्रह्मदेव आहेत का?; 'गद्दारी'च्या आरोपानंतर देवेंद्र भुयार भडकले

राऊतांनी 'गद्दारांना पाहून घेऊ', असा इशारा देत नावं जाहीर केली आहेत.

वैष्णवी कारंजकर

राज्यसभा निवडणुकीत काल भाजपाने दणदणीत विजय मिळवत यश संपादन केलं. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाची चव चाखावी लागली. संजय राऊतही थोडक्यात पराभवापासून बचावले. त्यानंतर त्यांनी काही अपक्षांनी गद्दारी केल्याचा आरोप केला. अशा आमदारांची नावंही त्यांनी जाहीर केली. देवेंद्र भुयार यांचंही नाव त्यात होतं. भुयार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

राऊतांच्या गद्दारीच्या आरोपानंतर देवेंद्र भुयार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे आता ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत, असं वाटू लागलंय. मतदान गोपनीय असतं, मी मत दिलं नाही, हे यांना कसं माहित? मी कुठलाही दगाफटका केलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे, पण माझी वैयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातले काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरून माझी नाराजी नाही. माझी मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी मी उघडपणे व्यक्त केली. उद्धव ठाकरेंसमोर नाराजी मांडायची नाही तर काय दाऊदसमोर मांडायची का?"

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रातून सात उमेदवार लढतीत होते. भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आले. मात्र शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले, तर अवघ्या काही मतांनी संजय पवार थोडक्यात निवडून आले आहेत. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१ मतं मिळाली तर राऊतांना ४१.५. मात्र संजय पवारांना ३९ मतांवर समाधान मानत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काही अपक्षांनी गद्दारी करत शिवसेनेला मतदान न केल्याची टीका संजय राऊतांनी केली.

राऊतांनी गद्दार आमदारांची नावंही वाचून दाखवली. त्यामध्ये त्यांनी संजयमामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार, तसंच बहुजन विकास आघाडीचे हिंतेंद्र ठाकूर यांची नावं घेतली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी मेळासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक

Supreme Court: मोठी बातमी! मुलांच्या बालपणी पालकांनी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Yuzvendra Chahal: माँ कसम खाओ... चहलची पोस्ट व्हायरल; धनश्रीवर साधला निशाणा

Central Railway: दिवाळी संपली तरीही गिफ्टचा धडाका सुरूच! आणखी विशेष गाड्यांची घोषणा; रेल्वेचा मोठा निर्णय

फक्त मराठीत नाही तर या प्राचीन भाषेतही रिलीज झाला अभंग तुकाराम सिनेमाचा टीझर !

SCROLL FOR NEXT