महाराष्ट्र

LIVE : काँग्रेसचं आंदोलन चिघळलं; भाई जगताप पोलिसांच्या ताब्यात

सुधीर काकडे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) महाराष्ट्र भाजप विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन सुरू असून, पंतप्रधानांनी माफी मागावी ही मागणी घेऊन काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. तर राम कदम यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही भाजपा कार्यकर्ते कॉंग्रेस नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाणार. मात्र आज आर पार होऊनच जाऊ दे असा आक्रमक पवित्रा भाजप आमदार राम कदम यांनी घेतला आहे. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसंच आज आम्ही बघू कोणाच्या मनगटात किती ताकद आहे. आम्ही वाट पाहतोय या...असं आव्हान राम कदम (Ram Kadam) यांनी काँग्रेसला (Congress) दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र भाजप विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन सुरू असून, पंतप्रधानांनी माफी मागावी ही मागणी घेऊन काँग्रेस आक्रमक झाली आहे.

काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते आक्रमक झाले असून, संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या भाई जगताप यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असताना काँग्रेस नेते भाई जगताप संतापले आहे. राम कदम यांच्या आव्हानालं देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी भाई जगताप यांनी आक्रमक होत काही पंतप्रधान आणि भाजपविरोधात तिखट शब्दांत टीका केली.

या सर्व घडामोडी सुरु असतानाच काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एक खोचक ट्विट केलं आहे."स्कार" चा पराभव करण्यासाठी जंगलातील कितीही छोटे छोटे प्राणी एकत्र आले तरी त्यांना तो "सिम्बा" शिवाय करता येणे अशक्य असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमने-सामने येऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर काँग्रेस कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले दिसत आहेत.

भाजपशी चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत. पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी भाई जगताप यांनी केली आहे.

भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी. दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं संघर्ष निर्माण होण्याची शक्यता.

पोलिसांनी काँग्रसचा मोर्चा आडवला.

तर तिकडे काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. मुंबईतील मुलूंड परिसरात यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने सामने आले असल्याचं दिसतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Wayanad: राहुल गांधींचे ठरले! अखेर वायनाडचा 'हात' सोडला

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

SCROLL FOR NEXT