Ram Mandir Ayodhya:  
महाराष्ट्र बातम्या

"जो राम का नही वह किसी काम का नही"; काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारल्यानंतर भाजपची टीका

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर भाजप नेत्यांनी टीका केली. तसेच गुजरात काँग्रेसचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी हायकमांडच्या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली.

Sandip Kapde

Ram Mandir Ayodhya: काँग्रेस नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. बुधवारी ही माहिती देताना काँग्रेसने हा कार्यक्रम भाजप आणि आरएसएसचा कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी टीका केली. तसेच गुजरात काँग्रेसचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी हायकमांडच्या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली.

काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा ७/१२ मागत होते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

काँग्रेस राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं आहे.

यापूर्वी काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं, जय श्रीराम!, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT