Ramdas Athawale sakal
महाराष्ट्र बातम्या

मविआ सरकार अल्पमतात त्यामुळं शिवसेनेनं गुंडगिरी थांबवावी - आठवले

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.

सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत सेनेविराधात बंड पुकारल्यामुळे मागील काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसरकारवर आरोप केले आहेत.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या स्थितीत राजीनामा द्यायला हवा. अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा करत असलेला दावा हास्यास्पद आहे, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे ते म्हणाले, शिवसेनेचे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत त्यांच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. पोलिसांच्या समोर हल्ले होत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेचा वारसा आहे. त्यावर हल्ला होत आहे. राज्याची प्रतिमा डागाळली जात आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

शिवसेनेने पराभव स्वीकारला पाहिजे. त्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करणे, गुंडगिरी करणे योग्य नाही. शिवसेनेने गुंडगिरी थांबवावी. अन्यथा गुंडगिरीला गुंडगिरीने उत्तर द्यावे लागेल. गुंडगिरीने शिवसेना सरकार वाचवू शकणार नाही, असा इशाराही मंत्री आठवले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT