Shivsena Uddhav Thackeray Ramdas Athawale Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Row : उद्धव ठाकरे कोणत्याही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही - रामदास आठवले

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे ते active असणारे मुख्यमंत्री आहेत, असंही आठवले म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र हा सत्तासंघर्ष नाही, सत्ता शिंदे- फडणवीसांना मिळाली आहे, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरेंना कुठल्याही कोर्टात न्याय मिळणार नाही, असंही आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवले पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर भाष्य केलं आहे. आठवले म्हणाले, "हा सत्तासंघर्ष नाही. सत्ता शिंदे-फडणवीस यांना मिळाली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे आता कुठल्याही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही. जनतेच्या दरबारात गेले तरीसुद्धा त्यांना न्याय मिळणार नाही. न्याय आम्हालाच मिळेल. शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, ते Active असणारे मुख्यमंत्री आहेत."

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. या निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप झाला, त्यावरही आठवले यांनी उत्तर दिलं आहे. आठवले म्हणाले, "नियम भंग झाल्याची जी तक्रार आहे, त्यावर कारवाई होईल. मला खात्री आहे, दोन्ही ठिकाणी भाजपा निवडून येईल. पैसे वाटले गेले असतील तर पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT