Ramdas-Athawale
Ramdas-Athawale 
महाराष्ट्र

'आंबेडकरांनी भाजपला थेट पाठिंबा द्यावा' - रामदास आठवले

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - 'भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कायम आडमार्गाने भारतीय जनता पक्षालाच मदत करत असतात, तर त्यांनी थेट भाजपला पाठिंबा द्यावा. त्याचा फायदा दलितांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताकद आपण दोघे मिळून वाढवू,'' असे खुले आवतन देत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांची कोंडी केली.

भारिप आणि एमआयएमबरोबरच्या राजकीय समीकरणांविषयी वेगवेगळी गृहितके मांडली जात आहेत. त्याच वेळी एकाच समाज घटकावर मतांचा दावा सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या नवीन राजकीय खेळीविषयी रामदास आठवलेंनी थेट प्रतिक्रिया व्यक्‍त करीत आंबेडकरांना आव्हान दिले आहे. एमआयएमबरोबर प्रकाश आंबेडकर गेल्यास त्याचा फायदा निश्‍चितच भाजपला होणार आहे. कॉंग्रेसनेच या युतीची काळजी करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे नेहमीच भाजपला आडमार्गाने मदत करतात. त्यांनी एमआयएमबरोबर जाण्यापेक्षा भाजपबरोबर आल्यास दलितांना त्याचा फायदा होईल, असे मतही आठवलेंनी व्यक्‍त केले.

दलित-सवर्ण एकोप्यासाठी आंतरजातीय विवाहाची गरज
सरकार भाजपचे असो वा कॉंग्रेसचे, दलितांवर अत्याचार होत आहेत हे वास्तव असल्याची चिंता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्‍त केली आहे. दलित-सवर्णांमध्ये एकोपा व्हावा, यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची गरजही आठवलेंनी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT