Ramdas Kadam- Anandrao Adsul Sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंकडून गुलाबराव पाटील, अडसूळांची हाकालपट्टी तर शिंदेकडून नेतेपद बहाल

एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांना नेतेपद देण्यात आलं आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांची शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे हा वाद टोकाला गेला आहे.

(Uddhav Thackeray Removes Ramdas Kadam And Anandrao Adsul)

रामदास कदम यांनी आज सकाळी आपल्या नतेपदाचा राजीनामा दिला होता. तर आनंदराव अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान दोन्ही नेत्यांचे मुले हे शिंदे गटासोबत पहिल्यापासूनच गेलेले आहेत. रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे यांनी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून या दोन्ही नेत्यांनी नेतेपद बहाल करण्यात आलं आहे.

शिवसेना

शिंदे यांनी जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली आहे तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड केली गेली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे १४ खासदारही उपस्थित होते असं सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये रामदास कदम, आनंदराव आडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांची उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT