Ramdas Kadam 
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam: मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर रामदास कदमांची भाषा बदलली, म्हणाले, गजाभाऊंना...

गजानन कीर्तिकर यांच्यासोबत सुरु झालेला वाद आता १०० टक्के मिटला असल्याचं वक्तव्य रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये ऐन दिवाळीत शाब्दिक फटाकेबाजी सुरु झाली होती. याप्रकरणी रामदास कदम यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी गजानन कीर्तिकर यांच्यासोबत सुरु झालेला वाद आता १०० टक्के मिटला असल्याचं वक्तव्य रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं आहे.

रामदास कदम म्हणाले की, रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यामध्ये दिवाळीत फटाके फूटत होते. शिमगा देखील या नेत्यांकडून पाहायला मिळाला. तो भविष्यामध्ये या दोन नेत्यांकडून होणार नाही. कालच गजाभाऊंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मीही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आधी तुमच्याकडे यावं, थेट माध्यमांकडे जाता काम नये. अशा सूचना गजाभाऊंना द्यावात अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली.

नवीन पक्ष आहे. अनेकजण विश्वास ठेवून पक्षात आले आहेत. ग्रामपंचायतमध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. अशात दोन नेत्यांमध्ये वादावादी सुरु आहे हे भूषावहं नाही, याची जाणीव मला देखील आहे. भविष्यात दोघांकडून अशाप्रकारचं काही होणार नाही. भविष्यात आमच्यात राजकीय वाद होणार नाहीत, असं रामदास कदम म्हणाले.

मर्डरच्या सुपाऱ्या

मी आयुष्यात खूप लढलो आहे. अनेकांनी माझा मर्डर करण्याच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत. साळसकर इथे नाहीत, ते याचे साक्षीदार आहेत. मी कफण बांधून पक्षासाठी लढलोय. निष्ठावान म्हणून महाराष्ट्र मला पाहतो. त्यामुळे रामदास कदमांना राजकारणातून संपवण्यासाठी एखादी प्रेसनोट काढणं कितपत योग्य आहे. तसेच गद्दार म्हणणं कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला.

मी आयुष्यात कधी कंबरेच्या खाली वार केला नव्हता. पण, कालच्या प्रकरणामध्ये मी केला. कारण त्यांनी अनेक खोटे आरोप केले होते. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. असं होत नाही. त्यामुळे ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे जाण ठेवूनच आरोप केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मी आणि गजाभाई कसलाही राजकीय वाद घालणार नाही असं सांगून आलोय , असं कदम म्हणाले.

मी गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. शंभर टक्के वाद मिटला आहे. याच नाही तर इतर मुद्द्यांवर देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये कीर्तिकर खासदार आहेत. त्यामुळे तेच निवडणूक लढवतील. मला यात कसलीही आपत्ती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांना खोटं बोलून दिशाभूल करणाऱ्या नेत्यांमध्ये अनिल परब एक नेते आहेत, असं म्हणत त्यांनी टीका केली. शिवसेना प्रमुख असते तर हे सहन केलं नसतं. पक्षाची शिस्त सगळ्यांनी पाळली पाहिजे. कीर्तिकर पत्रकारांकडे गेले त्यामुळे मला बोलावं लागलं. मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की, ते थांबणार असतील तर मी थांबतो, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT