ramdas kadam criticized to uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचे अध्यक्ष होणार का? रामदास कदम म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. दोन्ही बाजुंनी दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तर बंडखोर गटाकडून बंडखोरीचं कारण देण्यात येत असून शिवसेनेकडून आतापर्यंत दिलेल्या संधी सांगितल्या जातात. आज रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडलं असत तर शिवसेना फुटली नसती, असं म्हटलं. (Ramdas Kadam news in Marathi)

दरम्यान एकनाथ शिंदे गटाने पक्ष स्थापन केल्यास नव्या पक्षाचे अध्यक्ष होणार का, असा प्रश्न रामदास कदम यांना विचारण्यात आला. त्यावर रामदास कमद म्हणाले की, तसा प्रश्नच येत नाही. मी शिवसेनेचा भगवा झेंडा सोडून कुठेही जाणार नाही. माझा मुलगा आमदाराकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवेल. बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमान करणार नाही, असही कदम यांनी म्हटलं.

मी बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहे. ज्यादिवशी उद्धवजी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडतील, त्या दिवशी मी उद्धवजी यांच्या नेतृत्वात काम करेल, असही कदम यांनी नमूद केलं.

एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालले तर उद्धव ठाकरे शरद पवारांचे विचारांनी पुढे जात असल्याची टीका कदम यांनी केली. ते म्हणाले की, माझ्या मुलाच्या मतदार संघात मनसेचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचं काम करतो. त्याची भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही बाहेर काढली होती. ती प्रकरणे आम्ही वरती पाठवली. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांना शब्द दिला होता, असं एकनाथ शिंदेंकडून कळलं. असं असेल तर आम्ही काम कस करायचं, असा प्रश्न कदम यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT