Ramdas Kadam esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam: 'आमचे खोके काढण्याआधी तुम्हाला लाज वाटली पाहिजे' ठाकरेंबद्दल बोलतांना कदमांची जीभ घसरली

सकाळ डिजिटल टीम

खेडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खेडमध्ये शिवसेनेची उत्तर सभा संपन्न होत आहे. या सभेतून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर तुफान फटकेबाजी केली. आमच्यासमोर कुणीही आलं तरी त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कदमांनी दिला.

'पन्नास खोके, एकदम ओक्के' या महाविकास आघाडीच्या उद्घोषणेला रामदास कदम यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. ते म्हणाले. खोक्यांचं काय सांगता? तुमचे सगळे खोके एकदिवस मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे.

मराठवाड्यामध्ये खोके वाटून तुम्ही तुमची उंची मी वाढवली आहे. तुमच्या हाताने खोके वाटले आहेत. त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवण्याआधी लाज वाटत नाही का? असं म्हणून त्यांना थेट उद्धव ठाकरेंची लाज काढली. आमच्या खानदानासमोर कुणी आलं तर त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कदमांनी यावेळी दिला.

काय म्हणाले रामदास कदम?

  • बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर हे दुकान बंद करील

  • परंतु उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत बेईमानी केली

  • भास्कर जाधवचे चमचे असतील, त्यांना म्हणावं बघा किती लोक आलेत. रस्ते ब्लॉक झालेत.

  • शिवसेना कुणाचीय हे एकनाथ शिंदेंनी आता सिद्ध करुन दाखवलंय

  • उद्धव ठाकरेंनी मलाही पाडण्यासाठी माणूस उभा केला होता.

  • परंतु जाधवची मला पाडायची औकात काय?

  • दापोलीतही योगेश कदम यांना पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला

  • योगेश कदमला पाडण्याच्या गटात उदयजी तुम्ही होतात पण कटात नव्हतात

  • तुम्ही सुभाष देसाईंसारख्या शेळ्यामेंढ्यांना सांभाळताय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याने वाद, मंगळवेढ्यातील प्रकार चर्चेत

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT