Ramdas Kadam esakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta Foxconn : सरकारची अजून हळदही उतरली नाही, मग...रामदास कदमांनी विरोधकांना फटकारले

राज्यात वेदांता-फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरु घमासान माजले आहे.

धनश्री ओतारी

राज्यात वेदांता-फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरु घमासान माजले आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी विरोधकांना फटकारलं आहे. (Ramdas Kadam Replied To Aditya Thackeray On Vedanta Alligation )

भाजप सरकार राज्यातील प्रकल्प फायद्यासाठी गुजरातला हलवले जात असल्याचा आरोप शिवसेना आणि विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपाला रामदास कदम यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

शिंदे भाजप सरकार काल आले आहे, अजून शिंदे - फडणवीस सरकारची हळद देखील उतरली नाही. एखादा प्रोजेक्ट जर राज्यातून बाहेर गेला असेल, तर त्यासाठी शिंदे - फडणवीस सरकार कसे कारणीभूत असू शकेल," अशा शब्दात रामदास कदम यांनी विरोधकांना फटकारले आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

प्रकल्प बाहेर जाणे हे सर्व महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, इतका मोठा रोजगार देणारा प्रोजेक्ट बाहेर जातो कसा? या बाबतची अधिकची माहिती घेणे गरजेचे आहे, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत सखोल चौकशी करावी, आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. आपण कुठे कमी पडलो, पुन्हा हा प्रकल्प आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून आणू शकतो का? या विषयावरही आपण चर्चा करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

तसेच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या खोक्याच्या आरोपावरही भाष्य केलं. काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. ‘स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’, असं हे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे खोका-खोका करत आहे. मात्र, खोक्याचा विषय मातोश्रीला नवीन नसल्याने त्यांचा जप सुरू आहे, असे ते म्हणाले.

आम्ही त्याला साक्षीदार आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भान ठेऊन बोलावं. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. खोक्याचे राजकारण हे फक्त आमच्या आमदारांना बदनाम करण्यासाठी आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हे बालिशपणाचे लक्षणं आहेत”, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT