MP Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: वस्ताद लागले कामाला! १४ तारखेला मोठा पक्षप्रवेश; अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदाराचीही घरवापसी

Deepak Chavan: विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा स्वतः अजित पवार यांनी केली होती. परंतु आता अजित पवार यांना आता नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये राज्यभरातून अनेक नेते घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे.

संतोष कानडे

Ramraje naik nimbalkar: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार गटामधून अजित पवारांसोबत गेलेले रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या १४ तारखेला त्यांचा प्रवेश होईल, अशी माहिती आहे.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत अजित पवार यांच्या पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हेदेखील तुतारी फुंकणार आहेत. १४ तारखेला जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडणार, असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा स्वतः अजित पवार यांनी केली होती. परंतु आता अजित पवार यांना आता नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये राज्यभरातून अनेक नेते घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक पक्षप्रवेश होतील, असं स्वतः शरद पवार यांनी सोमवारी इंदापूरच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलं होतं. पवार म्हणाले की, राज्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे, यासाठी अनेक नेते आम्हाला येऊन भेटत आहेत. इंदापूरमध्ये येत असताना फलटणकरांचा फोन आला त्यांच्याकडे १४ तारखेला जायचे आहे, असं म्हणत पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले.

जो कार्यक्रम इंदापूरला होतोय, तोच कार्यक्रम फलटणला होईल, असं स्वतः शरद पवार म्हणाले. त्यामुळे आता १४ ऑक्टोबर रोजी रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश होतील, हे निश्चित आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

आमदार दीपक चव्हाण हेच फलटण मतदारसंघातून उमेदवार असतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर करून त्यांना सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन केले होते. सोळशी (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला; परंतु त्यांनी दूरध्वनीवरून बाळासाहेब सोळसकर यांच्या मोबाईलवरून ३० ऑक्टोबर रोजी उपस्थितांशी २० मिनिटे संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT