Disale Guruji Sakal
महाराष्ट्र बातम्या

डिसले गुरुजींना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर

तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे डिसले गुरूजींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ranjitsinh Disale Award : बार्शी येथील जागतिक 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण डिसले गुरुजींना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे डिसले गुरूजींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रणजितसिंह डिसले गुरूजींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

पुरस्काबाबत डिसले यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात की, ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं अशा आदरणीय डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली आहे. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञाम आणि तंत्रज्ञान, महिला सबलीकरण, संगीत क्षेत्रातील तसेच कोरोना काळात महत्त्वाची जबाबदारी बजवणाऱ्या वॉरियर्सला हा पुरस्कार देण्यात येतो.

दरम्यान, ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली असून, 8 ऑगस्टला डिसले गुरूजी यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत अभ्यासाठी डिसले गुरुजींना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT