shivsena bjp latest political news 
महाराष्ट्र बातम्या

सध्याचं महाभारत संजय राऊतांमुळेच; दानवेंचा हल्लाबोल

जनतेला ही युती मान्य नव्हती त्यामुळे CM शिंदेंनी हा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जनतेला ही युती मान्य नव्हती त्यामुळे CM शिंदेंनी हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले. जनतेनं भाजप-सेनेच्या युतीला कौल दिला होता पण सेनेनं दगा फटका केला, असा हल्लाबोल भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दानवे म्हणाले, शिवसेना आणि भाजपचा विचार एकच आहे, विचारांवर आधारित ही युती होती. २५ वर्ष ही युती राहिली होती. परंतु ही युती असताना एकत्र विधानसभा, लोकसभा निवडणुका लढलो. जनतेने युतीला कौल दिला होता. मात्र शिवसेनेनं दगाफटका केला. राज्यातील जनतेनं दिलेला कौल त्यांनी डावलला, आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली. ही युती जनतेला मान्य नव्हती या युतीला जनताही कंटाळली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी हा निर्णय घेतला.

पुढे ते म्हणाले, शिंदे गटाने बंड नाही उठाव केला आहे. सेनेतील आमदार खासदारांनी उठाव केला आहे. सेना आणि भाजप युती हिंदुत्वाच्या विचारांवर चालत होती. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी ठाकरेंनी हा दगा केला, असा घणाघातही दानवेंनी केला आहे. ते म्हणाले, शिवसेनेतील फुटीसंदर्भात भाजपचा काहीही संबंध नाही, उलट भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आणि सेनेचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब केला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT