Congress esakal
महाराष्ट्र बातम्या

लोकसभेचं तिकीट मिळालं पण जातवैधता प्रमाणपत्र ठरलं रद्द; काँग्रेसच्या उमेदवाराचं भवितव्य धोक्यात

रामटेक मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

Rashmi Barve Caste Validity: अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जात वैधता पडताळणी समितीने रद्द केले. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्याने त्यांचा उमेदवारी अर्जही बाद झाला. (Latest marathi News)

रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्रसंदर्भात जात पडताळणी समितीकडे तक्रार करण्यात आली होती. बर्वे यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील पांढुर्णा तालुक्यातील असून त्यांनी दिलेली कागदपत्रे खोटे असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते. त्यांनी दिलेले इतर दाखलेही बनावट असल्याचे यात नमुद होते. या तक्रारीच्या आधारे विभागाने बर्वे यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. त्यांनी उत्तरही दाखल केले. दरम्यान, विभागाच्या दक्षता पथकाने मध्यप्रदेशातील त्यांच्या मूळ गावी भेट दिली.

त्यांचे नातेवाईक तिथेच राहत असून १९५० पूर्वी त्यांचे नातेवाईत पांढुर्णा येथेच वास्तव्यास असल्याचे तपासणीत आढळले. बर्वेंनी वडील अशिक्षित दाखवले असले तरी प्रत्यक्षात ते शिक्षित असल्याचे समोर आले. दक्षता पथकाने नरखेड व काटोल येथे येथे जाऊन तपासणी केली. त्यांनी दिलेले कागदपत्र योग्य नसल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी जातीसाठी काटोल तालुक्यातील एका व्यक्तीस काका असल्याचे दर्शवले होते.

परंतु ते त्यांचे नातेवाईक नसून त्यांनी तसे दक्षता पथकाला लेखी लिहून दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बर्वे यांनी उपविभागीय अधिकारी व जात पडताळणी समितीला दिलेल्या वंशावळीमध्येही तफावत आहे. त्यांची जात चांभार असली तरी दिलेले कागदपत्र खोटे असल्याने त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात येत असल्याचा निर्णय समितीने दिला.

विभागाचीही चूक

रश्मी बर्वे यांना २०१२ मध्ये वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या काळातील सर्व जातवैधता प्रमाणपत्रे रद्द ठरवत दक्षता पथकाकडून तपासणी करून नव्याने वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. परंतु विभागाकडून त्यांची तपासणीच करण्यात आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT