rashmi shukla sakal
महाराष्ट्र बातम्या

Rashmi Shukla : क्लिन चिट मिळताच शुक्ला पोलीस महासंचालक होणार? केंद्राकडून खटपटी सुरू

रश्मी शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात म्हणून केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांना क्लिनचिटही देण्यात आली होती.

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातला तपास आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या आता पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्या महासंचालक पदासाठी पात्र ठरत नव्हत्या.

मात्र त्यांना आता राज्य सरकारने अभय दिलं आहे. त्यामुळे आता शुक्ला केंद्रात पोलीस महासंचालक पदी पात्र ठराव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात महासंचालकपदी पात्र ठरल्यानंतर त्यांचा राज्याच्या पोलीस सेवेत महासंचालकपदी येण्याचा मार्ग खुला होणार आहेत. सध्या मुंबई पोलीस आयुक्तपदी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT