Ratan Tata Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ratan Tata: रतन टाटांची प्रकृती स्थिर, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

संतोष कानडे

मुंबईः देशातले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. परंतु तेव्हा प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनीच सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. आता पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

रतन नवल टाटा हे भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून टाटा समूहाचे प्रमुख होते. ते ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत अंतरिम अध्यक्षही होते. रतन टाटा हे सध्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत आहेत. रतन नवल टाटा यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत.

रतन टाटा यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर रतन टाटा यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तब्येतीची माहिती देण्यात आलेली होती. त्यात त्यांनी, ''माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची मी सर्वांना खात्री देतो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मी विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.' अशी माहिती दिली होती. आता बुधवारी त्यांची पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे.

रतन टाटांची प्रकृती स्थिर

उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची अपडेट रात्री ९ वाजता आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. 7 तारखेपासून रतन टाटा यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रतन टाटा यांची अँन्जिओग्राफी झाली असून सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरणाखाली ICU मध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT