Tata  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ratan Tata : रतन टाटांना राज्य सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने उद्योगरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पहिलाच पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलेला आहे.

राज्य सरकारने उद्योरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. यंदाचे हे पहिचे वर्ष आहे. त्यामुळे पहिलाच पुरस्कार रतन टाटांना देण्यााचा निर्णय घेतल्याने सर्व स्तरातून या निर्णयाचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना प्रदान करण्यत येतो. याच धर्तीवर यावर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येत आहे.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. वास्तुविशारद बनण्याचे रतन टाटा यांचे बालपणीचे स्वप्न होते. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनी टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होते. रतन टाटा हे त्यांचे दत्तक घेतलेला मुलगा आहेत. जमशेदजी टाटा हे टाटा कंपन्यांचे संस्थापक होते.

टाटा ग्रुप भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. त्याला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. ते आजही टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Victim Father Statement: “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत येऊ नका” नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी राजकीय नेत्यांना फटकारलं

Shrirampur Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा खून; श्रीरामपुरात धक्कादायक घटना, घरगुती कलहाचा थरारक शेवट!

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट

Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

Delhi Judge Endlife : बाबा, मी आता जगू शकत नाही... ३० वर्षीय न्यायाधीशाने गळफास घेऊन संपवले जीवन, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT