Ration Shop Closed sakal
महाराष्ट्र बातम्या

Ration Shop Closed : राज्यातील रेशन दुकाने मंगळवार पासून तीन दिवस बंद

कमिशन मिळत नसल्याने आंदोलन; संपूर्ण देशभर आंदोलन,राज्यातील 51 हजारहून दुकानदार सहभागी

संतोष आटोळे

देशपातळीवर स्वस्त धान्य विक्रेत्यांमार्फत देण्यात येणाऱ्या मोफत धान्य योजनेमुळे विक्रेत्यांच्या 'कमिशन'ची जबाबदारी कोण घेणार, याबाबत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदारांनी मंगळवार (ता.07) ते गुरुवार (ता.09) या तीनबंद पुकारला आहे. त्यामध्ये राज्यातील तब्बल 51 हजारहून अधिक रेशन विक्रेते यामध्ये सहभागी होणार आहेत.

केंद्र सरकारने एक जानेवारीपासून देशातील गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील प्रति व्यक्ती पाच किलो धान्य व 'अंत्योदय अन्न योजने'च्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 35 किलो धान्य देण्याची योजना सुरू राहणार आहे.

त्या योजनेंतर्गत केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत मोफत धान्य योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची आणखी एका वर्षापर्यंत व्याप्ती वाढली आहे. मात्र, योजना राबविताना स्वस्त धान्य विक्रेत्यांना यात विचारात घेतले गेले नाही.

याबाबत देशपातळीवर 'ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशन'ची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत सात ते नऊ फेब्रुवारीपर्यंत देशव्यापी रेशन बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार तीन दिवस रेशन दुकान बंद राहणार आहे, असे निवेदन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहेत.

1) धान्य दुकानदारांच्या कमिशनबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, यासाठी देशव्यापी आंदोलनात पुणे जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार परवानाधारक सहभागी होणार आहेत. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील सुमारे तीन हजार दुकाने तीन रेशन बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.

- प्रभाकर पाडळे (कोषाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे)

काय आहेत मागण्या..

केंद्र सरकारने गेल्या आठ महिन्यांचे कमिशन अद्याप दिले नाही. राज्यासह देशातील सर्व परवानाधारक भयभीत झाले आहेत. पुढील काळात त्यांच्या उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

नव्या मोफत योजनेच्या मिळणाऱ्या कमिशनबाबत सरकारने कोणताही उल्लेख केला नाही. मोफत योजनेंतर्गत धान्य वाटपाचे कमिशन राज्य की केंद्र सरकार देणार हे अद्याप केंद्राने स्पष्ट केले नाही. केवळ गहू, तांदूळ वितरण करून चालणार नाही. तेल, डाळ, साखर आवश्यक वस्तूंच्या वितरणाचे काय, असा सवाल अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाने निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.

राज्यातील रेशन दुकाने व लाभार्थी स्थिती

राज्यात एकूण स्वस्त धान्य दुकाने : 51 हजार 596 असून यामध्ये वैयक्तिक दुकाने : 41हजार 202 ,महिला बचत गट चालवित असलेली दुकाने : 2 हजार 50, पुरुष बचत गट चालवित असलेली दुकाने : 48, ग्रामपंचायत चालवित असलेली दुकाने : 77, सहकारी संस्था चालवित असलेली दुकाने : 8 हजार 219

तर राज्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या

एकूण शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या : 2 कोटी 46 लाख 41 हजार यामध्ये पिवळी शिधापत्रिका (दारिद्र्यरेषेखालील) : 40 लाख 11 हजार 412, केशरी शिधापत्रिका : 82 लाख 57 हजार 743 ,पांढरी शिधापत्रिका : 11 लाख 41 हजार 611

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

Latest Marathi News Live Update: सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

या मूलांकाच्या लोकांपासून सावध राहा ! अंतर्ज्ञानी असतात हे लोक; भविष्यातील घटना आधीच समजतात

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT