Nanar Refinery News esakal
महाराष्ट्र बातम्या

Narendra Modi : पत्रकाराच्या मृत्यूचं प्रकरण नरेंद्र मोदींपर्यंत जाणार; ठाकरे गट आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः काल राजापूर येथे थार आणि दुचाकी अपघात होऊन त्यात पत्रकार शशिकांत वारीसे हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता संसदेच्या अधिवेशनामध्ये गाजणार असल्याचं दिसतंय. यासंदर्भात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

याप्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची दुसरी बाजू समोर आल्यानंतर अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.

ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत म्हणाले की, नाणार संदर्भात लिखान करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चालक पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थक होते, त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचं राऊत म्हणाले.

यासह अधिवेशनामध्ये शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी आवाज उठवणार असल्याचंही विनायक राऊत म्हणाले.काल सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. "मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो" अशा आशयाची ती बातमी होती. बातमीचे कात्रण ही वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात ही बातमी होती.

यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT