katal Shilpa  
महाराष्ट्र बातम्या

Ratnagiri : कातळशिल्पांमुळे इतिहासाचा आरंभबिंदू रत्नागिरी; 'युनेस्को'च्या वारसास्थळातही समावेश

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कातळशिल्प हा कोकणचा कदाचित सर्वाधिक मोठा ठेवा आहे. हा शब्द कोकणवासियांसकट साऱ्यांनी गांभिर्याने घेतला पाहिजे. तो मराठी आहे म्हणून नव्हे, तर या कातळशिल्पांसाठी इतका दुसरा चांगला शब्द असू शकत नाही. इतिहासात प्रत्येकाने मोहेंजोदडो, हडप्पा, सिंधुसंस्कृती याबद्दल शिकले असेल; परंतु येत्या दोन वर्षांत शाळा, महाविद्यालये आणि पदव्युत्तर शिक्षणात कातळशिल्पांचा अंतर्भाव असेल. मी फार दूरचा उल्लेख करत नाही, दोन वर्षांतच आपला इतिहास कातळशिल्पांमुळे रत्नागिरीतून सुरू होईल, असा दावा केंद्रीय पंचायतराज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य लेखापाल अखिलेश झा यांनी केला.

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या प्राथमिक यादीत कोकणातील कातळशिल्पांचे नाव जाहीर झाले आहे. त्यासंबंधी निसर्गयात्री संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता आलेल्या झा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भारताइतके प्राचीन दस्तावेजीकरण इतर कोठेही जगात झालेले नाही. आपले ऋषी उत्तम दस्तावेज बनवत, वेदांची सुक्ते वेगवेगळी आहेत त्यात कोणत्या ऋषीने कोणती सुक्ते रचली याचा उल्लेख आहे.

एवढेच नव्हे प्रत्येक सूक्त कोणत्या छंदात व कोणत्या मीटरमध्ये आहे याचाही उल्लेख आहे. दस्तावेज बनवण्याचे इतके चांगले उदाहरण इतरत्र नाही. मात्र आपण आत्मसन्मानाच्या मागे न लागता विश्वगुरु बनण्याऐवजी विश्वातील सर्वोत्तम छात्र बनणे आवश्यक आहे. तसे बनून कातळशिल्प गांभिर्याने घेतले पाहिजे. कातळशिल्पांमुळे इतिहास रत्नागिरीतून सुरू झाला तर ते सर्वात मोठे यश असेल. कातळशिल्पांमुळे आर्थिक भरभराट, पर्यटनवाढ यापलिकडे ही महत्त्वाची गोष्ट आहे हे ध्यानी घ्या.

झा म्हणाले की, आणखी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कातळशिल्पांच्या नोंदी करताना अनेक बाबींचा अभ्यास होणार आहे. आपल्याला त्या बाबींच्या नोंदीही करायच्या आहेत. कातळशिल्प ते आजचा काळ या दरम्यान अनेक गोष्टी अस्तंगत झाल्या आहेत. काही जीवजंतू नाहीत. हे वातावरण बदलाने घडले आहे. वातावरण बदल ही अत्यंत वास्तव बाब आहे आणि याचा अभ्यास होणारी रत्नागिरी ही सर्वांत मोठी प्रयोगशाळा यामुळे ठरेल, हे ध्यानी घ्या. कातळशिल्पांच्या अभ्यासामध्ये याचा अभ्यासही होणार आहे.

स्थानिक लोकांकडून सहकार्याची अपेक्षा

आणखी एक बाब म्हणजे आजवर पुरातत्त्व खात्याच्या कामात लष्कराचे लोक होते. मात्र शास्त्र विभागाचे, शास्त्र व तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ अपवादानेच होते. येथे मद्रास, हैद्राबाद आयआयटी, सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी विभागाचे वरिष्ठ संशोधक, तंत्रज्ञ वारंवार कोकणात येऊन काम करणार आहेत. येथील विद्यार्थ्यांशी, लोकांशी संवाद साधणार आहेत. यामुळे केवढे मोठे बौद्धिक परिवर्तन होणार आहे, याचा अंदाजही लागणे कठीण आहे. मात्र याचे महत्त्व ध्यानी घेऊन इथल्या स्थानिक लोकांकडून सहकार्याची अपेक्षा श्री. झा यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

पाकिस्तानचे प्रेक्षकही पलटले! संघ हरतोय दिसताच हिरव्या जर्सीवर चढवली टीम इंडियाची जर्सी; Viral Video

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

...अन् आईचे अश्रू बदलले आनंदाश्रूत, नऊ महिन्यांच्या बाळाने गिळलेली सेफ्टी पिन डॉक्टरांनी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT