Chhatrapati Sambhaji Raje Statue esakal
महाराष्ट्र बातम्या

रत्नागिरीत छत्रपती संभाजी राजेंचा महाराष्ट्रातील सर्वांत उंच पुतळा; काय आहे खासियत, किती आला खर्च?

भगवती किल्ल्यावरील शिवसृष्टीमुळे रत्नागिरी स्टॅच्यू सिटी (Ratnagiri Statue City) म्हणून नावारूपाला येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजी राजे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा पाया ३५ फूट असून, वर २१ फूट असा एकूण ५६ फूट उंच पुतळा आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे (Ratnagiri Tourism) वैभव अधिक खुलून दिसावे यासाठी शहराला ऐतिहासिक आणि धार्मिकतेची जोड देणारे भव्यदिव्य आकर्षक पुतळे उभारले जात आहेत. छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचा राज्यातील सर्वांत उंच पुतळा जिजामाता उद्यानात (Jijamata Park) उभारला आहे.

जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा, माळनाका येथील विठ्ठलाची मूर्ती आणि भगवती किल्ल्यावरील शिवसृष्टीमुळे रत्नागिरी स्टॅच्यू सिटी (Ratnagiri Statue City) म्हणून नावारूपाला येणार आहे. गोवा, केरळप्रमाणे रत्नागिरीतही स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. या दोन्ही राज्याच्या तुलनेत कोकणासह (Konkan) रत्नागिरीचा अपेक्षित पर्यटन विकास झालेला नाही. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्यादृष्टीने व्हिजन म्हणून मंत्री उदय सामंत (Uday Samant) काम करत आहेत.

आज कौशल्य विकास केंद्रांपासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा त्यांच्या पुढाकारामुळे उपलब्ध झाल्या. रत्नागिरी शहरातही पर्यटक (Tourists) थांबावा आणि त्या अनुषंगाने रत्नागिरीचा पर्यटन विकास साधण्यासाठी वेगळी संकल्पना त्यांनी मांडली असून, ती सत्यात उतरत आहे. रत्नागिरी शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेले थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मस्थळ, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ठेवलेल्या विशेष कारागृहालाही पर्यटक भेट देतात आणि निघून जातात.

यामुळे अपेक्षित पर्यटन विकास होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत. माळनाका येथे ३० फुटांची विठ्ठलाची पूर्णाकृती मूर्ती उभारण्यात आली आहे. राज्यातील सर्वांत मोठा छत्रपती संभाजी राजे यांचा पूर्णाकृती पुतळा जिजामाता उद्यान येथे उभारण्यात आला आहे. माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीही या उद्यानामध्ये मूर्ती ठेवण्यात आली आहे.

भगवती किल्ला येथे शिवसृष्टी उभारली जात असून, तेथेही अनेकांच्या मूर्ती असणार आहेत. शहरात मुख्य रस्त्यावर यापूर्वीच अनेक पुतळे आहेत. थिबा पॅलेस येथील लेजर शो, शहरात होणारे क्राँक्रिटीकरण, टिळक जन्मभूमीचे नूतनीकरण, अद्ययावत नाट्यगृह यामुळे रत्नागिरी शहर पर्यटन शहर म्हणून विकसित होत आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांची ही संकल्पना आहे. पर्यटनवाढीच्यादृष्टीने छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यातील सर्वांत उंच पुतळा उभारला आहे. विठ्ठलाची मूर्ती, शिवसृष्टी आदींमुळे पर्यटनवाढीला चांगली चालना मिळणार आहे.

-तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

५६ फूट उंच पुतळा

छत्रपती संभाजी राजे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा पाया ३५ फूट असून, वर २१ फूट असा एकूण ५६ फूट उंच पुतळा आहे. सुमारे दीड कोटी यावर खर्च करण्यात आले आहेत. विठ्ठलाची ३० फुटांची मूर्ती असून, त्यावरही सव्वा कोटी रुपये खर्च केले आहेत. ४ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. ५ ला सुमारे ३ हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठ्ठलाच्या मूर्तीचे अनावरण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT